जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांच्या दसऱ्या मेळाव्यासाठी २३० बसेस धावणार

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  |  शिंदे गटाकडून बीकेसी मैदानावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्या करिता जिल्ह्यातून २३० एस टी बसेस आरक्षित करण्यात आले आहेत.

 

उद्या बुधवार दि. ५ ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री एक्नाथ शिंदे यांचा दसरा मेळाव्याचे बीकेसी मैदान मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिक खासगी वाहन तसेच एसटी बसेने रवाना होत आहेत. यात जळगाव जिल्ह्यातून पाचोरा, एरंडोल, भडगाव, पारोळा येथून विशेष बसेस सोडण्यात आल्या आहते. यात सर्वात जास्त बसेस पाचोरा येथून ७५ तर एरंडोल, भडगाव व पारोळा येथून प्रत्येकी ५० बसेस सोडण्यात येणार आहे. तसेच चोपडा येथून ५ बसेस मुख्यमंत्री शिंदे यांच्या मेळाव्यासाठी धावणार आहेत. ह्या सर्व बसेस गुरुवार दि. ६ ऑक्टोबर रोजी आपापल्या आगारात परतणार आहेत. ह्या बसेस प्रासंगिक कराराने घेण्यात आल्या असून यांचे शुल्क केंद्रीय कार्यलयात प्रती किलोमीटर ५५ रुपये प्रमाणे आधीच जमा करण्यात आलेले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली. जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या मतदार संघातून ह्या सर्व बसेस धावणार आहेत हे विशेष.

 

Protected Content