संचारबंदी : श्री अष्टभुजा मल्टिपर्पज फाऊंडेशनतर्फे धान्य वाटप

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील श्री अष्टभुजा मल्टिपर्पज फाऊंडेशनतर्फे कलिंका माता मंदिर , खेडी, ज्ञानदेव नगर परिसरातील पावरा, वाचमनकी करणाऱ्या कुटुंबांना धान्याचे वाटप शुक्रवार १० एप्रिल रोजी करण्यात आले

श्री अष्टभुजा मल्टिपर्पज फाऊंडेशनतर्फे ५ क्विंटल गहू, २ क्विंटल तांदूळ, आणि १ लिटर तेल पाउचचे वाटप गरजुंना करण्यात आले. याप्रसंगी राजेंद्र खडके फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील बंटी भारंबे, सचिव मुविकोराज कोल्हे संजय पाटील, विनय खडके, वासुदेव सरोदे, सतीश खडके, रवींद्र खडके, शशिकांत चौधरी, सुरेश खडसे, हेमराज पाटील, गुनुवंत पाटील, नयन राणे, बंटी बऱ्हाते, प्रवीण पाटील, निखिल खडके, अक्षय खडके, जयेश पाटील, मनीष चौधरी,सागर चौधरी, दिलीप महाजन, विशाल खडके, बंटी खडके, आदी उपस्थित होते.

Protected Content