आम्हाला पगार द्या, मजुरांकडून सुरतमध्ये दगडफेक आणि जाळपोळ

सुरत (वृत्तसंस्था) लॉकडाऊनदरम्यान शुक्रवारी सुरतमध्ये हाती काम नसल्यामुळे मजुरांनी आपल्याला पगार दिला जावा तसेच पुन्हा घरी परतण्याची परवानगी दिली जावी, या मागणीसाठी दोन ठिकांनी दगडफेक आणि जाळपोळ केली.

 

येथील डायमंड बुर्समध्ये बांधकाम मजूर आणि लसकाणामध्ये सूतगिरणी कामगार रस्त्यावर उतरले. कामगारांनी अनेक रस्ते अडवून ठेवले होते तसेच दगडफेकही केली. लॉकडाऊन सुरु राहिले, तर राहायचे कसे?, असा सवाल करत एकतर काम सुरु करा किंवा घरी तरी जाऊ द्या, अशी मागणी या कामगारांनी केली. यावेळी सूतगिरणी कामगारांनी भाजीच्या पाच गाड्यांना आग लावली. तसेच अॅम्बुलन्स आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांची तोडफोड केली. यामधील अनेक कामगार ओडिशाचे नागरिक आहेत.

Protected Content