डॉ विजयानंद कुलकर्णी यांना उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत पुरस्कार

 

शेंदूर्णी : प्रतिनिधी ।   मनसे जळगांव जिल्हा उपाध्यक्ष व शेंदूर्णीच्या  गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष  डॉ.विजयानंद कुळकर्णी गोंदेगावकर यांना नुकतेच उपराष्ट्रपतींच्या  उपस्थितीत  राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

 

नवी दिल्ली येथे  ९ एप्रिलरोजी आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती  व्यंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यसभा खासदार डॉ.शशिकला पुष्पा रामस्वामी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. गेल्या १५ वर्षात केलेल्या शैक्षणिक, आरोग्य, राजकीय व सामाजिक  क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले  डॉ. कुळकर्णी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्द्ल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

 

Protected Content