कोरोना काळात चुंचाळे गावातील आदीवासी तरूणाची गरजूंच्या मदतीसाठी धाव (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीच्या काळात आदीवासी तरूण तथा सामाजिक कार्यकर्ते मिरखा नुरखा तडवी यांनी इंधनाचा खर्च घेत मोफत रूग्णवाहिका गरजू व्यक्तींसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या कार्याचे कौतूक होत आहे.

तालुक्यातील चुंचाळे येथील सामाजिक कार्यकर्ते मिरखा नुरखा तडवी हे समाज सेवेसाठी नेहमी तत्पर असतात. कोरोनाच्या आपत्तीच्या काळात जवळची नाती दुर होतात पण जातीभेद न ठेवता माणुसकी जोपासणारी माणसे ही रूग्णंच्या मदतीसाठी धावुन येतांना दिसून येत आहे. त्यातील मिरखा तडवी यांचे उत्तम उदाहरण आहे.  गावातील व परिसरातील कोरोनाचे रूग्णांना आता फक्त्त इंधन खर्च देवून रुग्णालयात घेवुन जाण्यासाठी मोफत गाड्या मिळणार आहे. कोरोना  महामारी मुळे सर्वत्र रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढता दिसत असतांना अशा प्रसंगी रुग्णवाहीकांची  कमतरता सर्वत्र भासत आहे, या गोंधळलेल्या प्रसंगी अत्यंत गरजू रुग्ण साठी वेळेवर गाडी उपलब्ध व्हावी व त्यास तात्काळ वेळेवर उपचार मिळावे यासाठी गावातील आदीवासी समाजातील सामाजीक कार्यकर्ते मिरखा नूरखा तडवी यांनी आरोग्य सेवेसाठी हे पाऊल उचलले आहे, सध्या मुंबई महानगर पालिकेत मिरखा तडवी हे वाहन चालक या पदावर कार्यरत आहेत. तडवी समाजाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी ऍम्ब्युलन्स च्या संचालक मंडळ तसेच प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम करतात.

 

या माणुसकीचा धर्म पाळणाऱ्या एका छोटया गावात जन्मलेल्या आदीवासी कुटुंबातील मिरखा तडवी हे करीत असलेले समाजकार्य यामुळे त्यांची लोकांविषयी मदत बघून  अनेकानी तो करीत असलेल्या रुग्णसेवेच्या कार्यासाठी समाजात व गावात व परिसरात सर्वत्र यांचे कौतुक होत आहे. संकटात कुणालाही आपल्या वाहनांची गरज असेल त्यांनी चुंचाळे बोराळे गावात कुणाकडेही संपर्क करावा आपण आपल्या मदतीस येवु असे आवाहान मिरखा नुरखा तडवी यांनी केले आहे .

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/968815180613171

 

Protected Content