गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त यावल येथे फळवाटप

यावल प्रतिनिधी । लोकहितासाठी झटणारा कार्यकर्ता ते सर्वसामान्यांचे प्रतिनिधी व सरपंच, आमदार, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, जळगाव जिल्हाध्यक्ष, ते महाराष्ट्र राज्याच्या युती शासनाच्या काळात जलसंपदा मंत्रीमंडळातील शासनाचे संकटमोचक कॅबिनेट मंत्री, अशी दमदार राजकीय वाटचाल करणारे नेते आरोग्यदुत तथा एक कुशल संघटक आ. गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधून आज नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या भुसावळ मार्गावरील असलेल्या आई हॉस्पिटल येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, भाजपा नगरसेवक डॉ .कुंदन फेगडे, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी, भाजपा शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी, भाजपा शहर सरचिटणीस परेश नाईक, रितेश बारी ,अजय फेगडे सर,भूषण फेगडे,राहुल बारी,सागर लोहार,संदीप न्हावी तसेच भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यकर्त प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Protected Content