सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला ; जवान जखमी

 

 

 

 

 

hamla 2019330 162647 30 03 2019

जम्मू-काश्मीर (वृत्तसंस्था) पुलवामामध्ये सीआरपीएफची वाहने जात असताना एका कारमधील सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना ताजी असताना दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला केला आहे. हे बंकर स्टेट बँकेच्या बाहेर होते. यामध्ये एक जवान जखमी झाला आहे.

पुलवामामध्ये स्टेट बँकेच्या बाहेर असलेल्या बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. यामध्ये एक जवान जखमी झाला आहे, असे एएनआयने ट्विटद्वारे म्हटले आहे. जवानांची कुमक घटनास्थळी पोहोचली असून लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहे.

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यामध्ये आज (३० मार्च) एका कारमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला आहे. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. या स्फोटात कोणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या एका गाडीचे थोडे नुकसान झाले आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

Add Comment

Protected Content