विद्यापीठात एक दिवसीय संम्मेलनाचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, नवी दिल्ली व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ८ ऑक्टोबर रोजी ‘स्वातंत्र्य लढयातील आदिवासी नायकांचे योगदान’ या विषयावर अनुसूचित जमातिच्या विद्यार्थ्यांचे एक दिवसीय संम्मेलन होणार आहे.

विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात सकाळी १० वाजता आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून बिरसा मुंडा जनजाती केंद्रीय विद्यापीठ, राजपिपला, गुजरातचे कुलगुरू प्रा. मधुकर पाडवी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या संम्मेलनात वक्ते म्हणून जनजाती आयोगाचे संयोजक वैभव सुरंगे, जनजाती आयोगाचे अधिकारी आर.एस. मिश्रा, किनवट येथील पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रकाश टारपे हे मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. सुनील कुलकर्णी यांनी दिली.

Protected Content