मुक्ताईनगर नगरपंचायत कार्यालयात अनागोंदी कारभार

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी व इतर काही महत्त्वाच्या विभागीय अधिकारी यांचा कारभार प्रभारी स्वरूपात सुरू असल्याने कार्यालयीन कामकाजात प्रचंड अनागोंदी कारभार वाढून यातून नागरिकांची प्रचंड हेडसांड केल्याचा प्रकार समोर येत असून सर्व साधारण किरकोळ दाखल्यांसाठी, परवानग्यांसाठी नागरिकांना महिना महिना वाट पाहावी लागत आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली असून कार्यालयीन कामकाजात तात्काळ सुधारणा करण्यात यावी अन्यथा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या या नगरपंचायत कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनीच कुलूप लावावे, अशा तक्रारीचे निवेदन देत नगरसेवक संतोष मराठे यांनी संतप्त नागरिकांच्या सहभागाने जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराऱ्याचे निवेदन दिले आहे.

निवदेनानुसार, मुक्ताईनगर येथील नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम अभियंता हे पद रिक्त असल्याने येथे प्रभारी स्वरूपात कामकाज सुरू आहे तसेच येथील महत्त्वाचे टेबल असलेले कार्यालयीन अधीक्षक, लेखापाल, कर निरीक्षक हे नियमित कर्मचारी असूनही सदरील कर्मचारी जर आठ आठ दिवसा करता रजेवर गेला तर त्यांच्या जागेवरील पदभार दुसऱ्या कोणाला दिला जात नाही त्यामुळे या सर्व काळात नागरिकांना महत्त्वाच्या कामासाठी लागणाऱ्या एनओसी, उतारे ,दाखले ,जन्म- मृत्यूचे दाखले ,महत्वपूर्ण कागदपत्रे , बांधकाम परवानगी आदीसाठी महिना महिने फिरावे लागते त्यातच येथे प्रभारी राज असल्याने कार्यालयीन कामकाजात प्रचंड अनागोंदी कारभार वाढलेला असून, किरकोळ कारणावरून नागरिकांच्या कामांना हेतू पुरस्कर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

तसेच नियमित कर भरणा करणाऱ्या नागरिकांनाही आर्थिक मार्च भरणा केला असल्यावरही चालू मार्च भरणा करा असे सांगून त्यांची अडवणूक करून मध्येच त्याला पूर्ण चालू वर्षाचा भरणा करण्याची ताकीद दिली जाते आणि यासाठी त्याचे काम अडवण्यात येते यानंतर त्यानी कर भरणा केल्यावरही त्या नागरिकांना महिना सर्वसाधारण दाखल्यासाठी नगरपालिकेचे कार्यालयात चपला झिजवाव्या लागतात. त्यामुळे येथे हा सर्व भोंगळ कारभार केवळ आणि केवळ अर्थपूर्ण दृष्टीने होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत असून या प्रकाराला तात्काळ चा बसविण्यात यावा तसेच या प्रकाराची चौकशी करून संबंधित दोशींवर कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणी जिल्हा प्रशासनही कारवाई करण्यात सक्षम नसेल तर नगरपंचायत कार्यालयाला स्वतः प्रशासनानेच कुलूप ठोकून मोकळे व्हावे अशा इशाराचे निवेदन नगरसेवक संतोष मराठे यांनी देत भविष्यात नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यास मोठे जन आंदोलन शिवसेना स्टाईलने उभारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

Protected Content