व्यापारी संकुलांमधील स्वच्छतेसाठी मनसे आक्रमक

 

 

यावल , प्रतिनिधी । व्यापारी संकुल आणि मार्केटमध्ये शौचालय व्यवस्था नसल्याने नागरीकांची व विशेष करून महीला वर्गाची मोठया प्रमाणावर गैरसोय होत असल्याबाबतचे तक्रार निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते , साधन सुविधा आस्थापनाचे तालुका अध्यक्ष बळीराम पाटील यांच्या वतीने यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील यांना आज देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यात १५ते २० अशी मार्केट असुन या मार्केट मधील व्यापारी संकुलने आहेत या ठीकाणी लहान मोठे व्यापारी आणी ग्रामीण परिसरातील नागरीक खरेदी करीता नियमीत येत असतात यामुळे यावल शहरातील मार्केटमध्ये मोठी गर्दी होत असते , या व्यापारी संकुलन तसेच मार्केटमध्ये शौचालय काही ठीकाणी शौचालय आहे पण त्यांची अत्यंत दयानिय अवस्था झाली आहे.  एखाद्या मार्केटमध्ये महीलासाठी फक्त नांवालाच शौचालय असल्याचे दिसुन येत आहे.  तर एका मार्केटमध्ये तर महिलांचे शौचालय हे पुरूष वापरतांना दिसुन येत असुन सदरील बाब महीलांवर्गाच्या दृष्टीकोणातुन अत्यंत खेदजनक असल्याने  प्रशासनाने महीलावर्गाच्या या प्रश्नाकडे गांर्भीयाने लक्ष देणे गरजेचे आहे.

पुढील दहा दिवसाच्या आत महीला शौचालयांची व्यवस्था करावी तसेच ज्या ठीकाणी शौचालय आहेत त्या शौचलयाचा वापर केवळ महीलांसाठीच होईल याची दक्षता घ्यावी.  तात्काळ त्या ठिकाणी स्वच्छता करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते , साधन सुविधा व आस्थापना विभागाचे यावल तालुका अध्यक्ष बळीराम पाटील , तालुका उपाध्यक्ष निलेश खैरनार , मनसेचे तालुका सचिव संजय नन्नवरे ,कल्पेश पवार ,आबीद कच्छी , शुभम पाटील, अंकुश पाटील यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश डी पाटील यांच्याकडे केली आहे .

Protected Content