के.के.उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्यू कालेज मध्ये “वाचन प्रेरणा दिवस” साजरा

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील के. के. ऊर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यावयात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. कलाम यांचा जन्म दिवस सांस्कृतिक मंडळ व बज्मे उर्दूच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

शालेय वर्गवार व्हाटस् अप समुह वर ऑडियो, व्हिडिओ व यु ट्यूब द्वारे विध्यर्थीनीना माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन पट तसेच त्यांनी स्वदेश व जगभरासाठी केलेल्या कार्य व संशोधनाची माहिती देण्यात आली. इयत्ता १०वी अच्या विद्यार्थ्यांनी आयेशा अन्सारी, अनम फिरोज खान,अरशीन देशमुख यांनी आप आपल्या परिवारात घरीच राहून इंग्रजी साहित्याच्या चे वाचन करणारी क्लिप विषय शिक्षिका तस्वीर जहाँ शेख च्या माध्यमातून वर्ग समूहात शेअर केले. याप्रशंसिय कार्याबद्दल उर्दू विभागाच्या वतीने त्यांना मराठी बाल साहित्यिक पुस्तके बक्षीस स्वरूपात देण्याचे घोषित करण्यात आले.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत, मास्क परिधान करून उपस्थित कर्मचारी वर्गाने केलेल्या कार्यक्रमामध्ये प्राथमिक शाळा चे मुख्याध्पक अनिस अहमद शेख, अकिल खान बियावली, शेख मझहरोदीन, मोहसिन शाह, तबरेज शेख यांनी डॉ. कलाम यांच्या जिवनाशी निगडीत माहिती सादर केली. शाह झाकीर, शकीला शेख, जमिला शेख, मुश्ताक भिसती, लाईक अहमद, अब्दुल कय्युम शेख उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका शमीम बानो मलीक यांनी मार्गदर्शन केले.

Protected Content