बांभोरी येथील विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी येथील विवाहितेने राहत्या गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज दुपारी १ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी पाळधी पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

कविता राकेश सोनवणे (वय-२२) रा. दत्तनगर वाल्मिक नगर, बांभोरी ता. धरणगाव असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, कविता सोनवणे ही आपल्या कुटुंबियांसह राहते. आज रविवारी २५ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कविता यांचा विवाह दोन वर्षांपुर्वी झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. नातेवाईकांच्या माहितीनुसार कविता हिचे जळगावातील पिंप्राळा येथील माहेर आहे. काल शनिवारी कविता ह्या मुलीला घेवून माहेरी आल्या होत्या. आईकडे लहान मुलगी ठेवून त्या आज बांभोरी येथे गेल्या होत्या. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे.  शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पाळधी पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content