साकेगाव ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबध्द

वरणगाव प्रतिनिधी ।  भुसावळ तालुक्यात शिवसेनेच्या संघटनीकरणासाठी सुरू झालेले शिवसंपर्क अभियानात शिवसैनिक मनापासून सक्रीय राहतील. शिवसेना उपनेते, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्यामार्फत साकेगावचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांनी दिली.  ते साकेगाव ग्रामपंचायत कार्यलयात आयोजित बैठकीत बोलत होते. 

 

संतोष सोनवणे यांनी पुढे सांगितले की,  सेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला एकाकीपणा जाणवू देणार नाही. तसेच साकेगाव ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या, त्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी पक्षसंघटना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिल.  साकेगावातील सर्वसामान्य माणसाचे हित हा केंद्रबिंदू मानून पक्ष विस्तार आणि कार्यकर्ता सक्षमीकरणाचे व्यापक कार्यक्रम जोरदारपणे सुरु राहतील. तुम्ही समस्या सांगा आम्ही सोडवण्यासाठी मंत्रीमहोदयापर्यंत पाठपुरावा करू. पक्ष विस्तार आणि संघटना बांधणी याचे पक्षीय आदेश वेळोवेळी अमलात आणले जात आहे असे प्रतिपादन दीपक धांडे यांनी केले. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धिरज पाटील, उपतालुकाप्रमुख हिरामण पाटील, माजी नगरसेवक दीपक धांडे, सरपंच प्रतिनिधी विष्णू सोनवणे, रवी पाटील, बबलू धनगर, भूषण पवार, गोमा मराठे, अनिल सोनवल, युवराज कोळी, भूषण पाटील, पप्पू पटेल व मान्यवर उपस्थित होते.

 

Protected Content