वरणगाव आयुध निर्माणीतील रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे- संजय खन्ना

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगांव आयुध निर्माणीचे माजी महाप्रबंधक यांच्या कार्यकाळात अनेक वेळा रस्ते तयार करण्यात आले. या कामामध्ये महाप्रबंधक व अधिकाऱ्यांच्या संगनमताने करोडो रुपयांचा भ्रष्ट्राचार झालेला असून रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ठ दर्जाचे असल्याबद्दलची तक्रार पंतप्रधान यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी केलेली आहे.

सविस्तर वृत्त असे की,वरणगांव आयुध निर्माणी मध्ये रस्ता डांबरीकरणाच काम सुरू आहे.सदर रस्ता दुरुस्तीचे टेंडर माजी जी.एम.चटर्जी यांनी मंजुर केले होते.या टेंडरमधे गणेश तिवारी व खंडेलवाल हे अधिकारी सहभागी आहे.हे अधिकारी अनेक दिवसापासुन एकाच ठिकाणी कार्यरत आहे.शासनाच्या नियमानुसार तीन वर्षांच्या वर एकाच ठिकाणी कुठलाही अधिकारी राहू शकत नाही.पण वरणगांव आयुध निर्माणी मध्ये माजी जी.एम.चटर्जी यांच्या कार्यकाळात मनमर्जी सुरू होते. यामुळे आयुध निर्माणीमध्ये कायदयाचा भंग होत आहे.

सदर रस्त्याचे काम ठेकेदारास शासनाने ठरवून दिलेले नियमाप्रमाणे करणे हे अनिवार्य आहे.परंतु ठेकेदार सर्व नियम धाब्यावर ठेवून आपल्या मर्जीप्रमाणे काम करीत असून अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून रस्त्यांच्या कामामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्ट्राचार संबंधित अधिकाऱ्यांसोबत मिळून करीत आहे.या कामांशी निगडित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ठ दर्जाचे असून वारंवार एकाच ठेकेदाराला दिले जात आहे.जी एम चटर्जी यांच्या कार्यकाळात रस्त्यांची कामे किती वेळेस मंजूर करण्यात आली? या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून हे प्रकरण सीबीआय कडे चौकशी साठी पाठविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी केली आहे. 

Protected Content