Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
119


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील एका भागातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून तिचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील एका भागात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. २३ एप्रिल रोजी अल्पवयीन मुलगी घरी असतांना तिला अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले, उशीर होवून मुलगी घरी परत न आल्यावर तसेच कुठेही ती मिळून न आल्याने दोन दिवसानंतर मंगळवारी तिच्या कुटुंबियांनी तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी मुलीचे वडील यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरक्षिक रामकृष्ण मोताळे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound