तरुणाची तब्बल १५ लाख ३५ हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रीप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करुन त्यात नफा मिळवण्याचे आमषि देत जळगाव शहरातील देवीदास कॉलनीतील तरुणाची तब्बल १ लाख ३५ हजारात ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवार, २५ एप्रिल रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील देवीदास कॉलनीत पवन बळीराम सोनवणे वय २५ हा तरुण वास्तव्यास आहेत. १२ एप्रिल २०२३ ते २२ एप्रिल २०२३ दरम्यान पवन यास व्हॉटस्ॲप तसेच टेलीग्राम या सोशल मीडीयावर साईच्या माध्यमातून अनोळखी क्रमांकावरुन संपर्क साधत अनोळखी व्यक्तींनी पवन याचा विश्वास संपादन केला, तसेच क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा प्राप्त करुन देतो, असे आमिष तसेच खोटे आश्वासन संबंधितांनी पवन यास दिले.या बदल्यात पवन याच्याकडून संबंधितांनी वेळोवेळी तब्बल १५ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन स्वीकारली, त्या मोबदल्यात कोणतीही रक्कम पवन यास परत केली नाही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पवन सोनवणे याने याबाबत मंगळवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन अनोळखी क्रमाकांवरुन संपर्क साधणाऱ्या अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक अशोक उतेकर हे करीत आहेत.

Protected Content