Home आरोग्य जिल्ह्यातील ८८ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह

जिल्ह्यातील ८८ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह

0
32

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील ८८ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जिल्ह्यातील कोरोनाच्या अपडेटची माहिती एका प्रेस नोटच्या माध्यमातून दिली आहे. यानुसार-भडगाव, जळगाव, चोपडा, अडावद, अमळनेर, पारोळा पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या ८८ कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.
सर्व तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप अद्याप थांबलेला नसला तरी अलीकडच्या काळात जास्तीत जास्त रिपोर्ट हे निगेटीव्ह येत असल्याची बाब समाधानकारक मानली जात आहे. यातच आता रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.


Protected Content

Play sound