Home आरोग्य जिल्ह्यात नऊ नवीन कोरोना बाधीत; कोरोनाग्रस्तांची संख्या २६६ वर

जिल्ह्यात नऊ नवीन कोरोना बाधीत; कोरोनाग्रस्तांची संख्या २६६ वर

0
127


जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील ९ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून यात जळगाव, भडगाव, पाचोरा आणि चोपडा येथील रूग्णांचा समावेश असल्याची माहिती आज जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जिल्ह्यातील कोरोनाच्या अपडेटची माहिती एका प्रेस नोटच्या माध्यमातून दिली आहे. यानुसार-भडगाव, जळगाव, चोपडा, अडावद, अमळनेर, पारोळा पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 25 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 16 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर नऊ तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगावचे तीन, चोपड्याचे चार तर जळगाव व पाचोरा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 266 झाली आहे.

यातील भडगावमध्ये काही दिवसांपूर्वीच पॉझिटीव्ह रूग्ण आढळले असून आता तेथील रूग्णांची संख्या वाढीस लागल्याची बाब स्पष्ट झालेली आहे. तर चोपड्यातील कोरोनाचा प्रकोपदेखील वाढीस लागल्याचे आजच्या अहवालातून अधोरेखीत झालेले आहे.


Protected Content

Play sound