हिंगोणा गावातील विकास कामे निकृष्ठ दर्जाची; ग्रामस्थांची ओरड

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथील रस्त्याचे काम व विकास कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून होत आहे. असे असतांना एकाच ठेकेदाराकडे असे काम का दिले जात आहे ? असा सवाल नागरिकांमध्ये होत आहे.

यावल तालुक्यातील हिंगोणा ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात मागील एक वर्षापासुन शासनाच्या वतीने रस्ते काँक्रीटीकरणासह इतर लाखो रुपयांच्या निधीतून विकासकामे केली जात आहे. दरम्यान गावातील नागरीकांनी संबंधीत ठेकेदार ही कामे प्रशासकीय नियमानुसार ठरवून दिलेल्या निविदाप्रमाणे करीत नसल्याची तक्रार आहे. परिणामी हिंगोणा ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन झालेल्या सर्व कामांचे तिन तेरा वाजले आहे. हिंगोणा गावातील ग्रामस्थांनी सदरच्या कामांविरोधात तक्रार करून देखील उपयोग नसल्याचे दिसून येत असुन उलटपक्षी संबंधीत प्रशासकीय तांत्रीक यंत्रणा वारंवार एकाच ठेकेदारासच कामे देत असल्याने ‘दाल मे कुछ काला है’ असे बोलले जात आहे. यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग जळगावच्या माध्यमातुन या सर्व कामांची चौकशी करून त्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे .

Protected Content