पदोन्नतीमधील बंद करण्यात आलेले आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी

WhatsApp Image 2019 08 15 at 12.20.09 PM

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा आरक्षण बचाव कृती समिती जळगावच्या वतीने भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या रेल्वे स्थानकावरील पुतळ्याजवळ मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील बंद करण्यात आलेले आरक्षण हे सर्वोच्च न्यायाल्याचे निर्देशानुसार पूर्ववत करण्याच्या मागणी करीता लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात जळगाव जिल्हा आरक्षण बचाव कृती समितीचे जिल्हाध्यक्ष एस. टी. लोखंडे, विद्यापीठ कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जयंत रामदास सोनवणे, उपाध्यक्ष विकास देवराम बिऱ्हाडे, सचिव अरुण सपकाळे, सुनील सपकाळे, राजू सोनवणे, अजमल जाधव, सुनील आढाव,सुभाष पवार, आर. के. सोनवणे, राहुल नन्नवरे, भिमराव तायडे तसेच कास्टट्राईब संघटनेचे जिल्हाअध्यक्ष रविद्र तायडे, बाळासाहेब नन्नवरे आदी समस्त महसूल विभाग, एम.ए.सी.बी. विभाग,विद्यापीठ कर्मचारी,एस. टी. महामंडळ कर्मचारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालक मंत्री ना. गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले. तसेच  जिल्हाधिकारी यांना  निवेदन देण्यात आले.

Protected Content