मनपाच्या सेवानिवृत्तधारकांना भविष्य निर्वाह निधी देऊन निरोप

जळगाव, प्रतिनिधी  । महापालिकेच्या इतिहासात प्रथमच निवृत्तीच्या  दिवशीच कर्मचाऱ्यांचा  भविष्य निर्वाह निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याने निवृत्तधारकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

महापालिकेचे आज ३२ कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. यात कार्यकारी अभियंता विलास नेहते यांच्यासह   लिपिक ५,  मुकादम-१ , वाहनचालक- ६,  परिचारिका-२,  जकात निरीक्षक -१, पौंडीकीपर- १, नाकेदार -१, मजूर, शिपाई, गवंडी, वाचमन संवर्गातील १४ असे एकूण ३२ कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.

यासर्व ३२  कर्मचाऱ्यांंना महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच निवृतीच्या दिवशीच व मागील १० कर्मचाऱ्यांना  त्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम आज मिळणर आहे. यात आज निवृत्त होणारे ३२ व  निवृत्त झालेले पण मयत झालेले ८ व मागील ८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या ४८  निवृत्तधारकांना १ कोटी ६५ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.