जिल्हा पोलीस दलातून ४० अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस दलात असलेल्या वेगवेगळ्या पदावर असलेले ४० पोलीस अधिकारी व कर्मचारी आज ३१ मे २०२१ रोजी सेवानिवृत्त होत आहे.

जिल्हा पोलीस दलात असलेल्या वेगवेगळ्या पदावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी आज ३१ मे २०२१ रोजी सेवानिवृत्त होत आहे. यात एक चोपडा विभागाचे पोलीस उपअधिक्षक राजेंद्र रायसिंग, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मगन मराठे, अडावद पोलीस ठाण्याचे गोकुळसिंग बयास, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी असे एकुण ४० जणांची आज सेवानिवृत्ती होत आहे. 

सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी 

पोलीस उपअधिक्षक राजेंद्र शंकर रायसिंग, चोपडा विभाग, पोलीस उपनिरीक्षक मगन पुंडलिक मराठे (जिल्हा पेठ ),  पोलीस उपनिरीक्षक गोकुळसिंग नागोनसिंग बयास (अडावद पोलीस स्टेशन), पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पंढरीनाथ पाटील ( एमआयडीसी जळगाव), विरीष्ठ श्रेणी लिपक शांताराम मोरे (एसपी कार्यालय ,जळगाव), सहाय्यक फौजदार रविंद्र पाटील (जळगाव विशेष शाख), नामदेव निनू पाटील (शहर वाहतूक शाखा जळगाव), राजेंद्र दत्तात्रय महाजन (एसीबी जळगाव), रमेश लटकन पाटील (कासोदा), राजेंद्र रूपचंद कोलते ( शनीपेठ जळगाव), नागपाल भास्कर (यावल), महेबुब लालखॅ तडवी (पोलीस मुख्यालय), संतोष धुडकू पवार (मारवड ), शकुर अब्दुल रज्जा शेख (नियंत्रण शाखा), रमेश कौतीक कारले (पोलीस मुख्यालय), सलिम रसुल पिंजारी (शनीपेठ), अमृत माणिक पाटील (एलसीबी), कोमलसिंग डिगंबर पाटील (सावदा), भागवत गंगाराम गालफाडे (नियंत्रण कक्ष), ममराज सरदार जाधव (पाळधी), दत्तू दौलत खैरनार (पाळधी), चालक सहाय्यक फौजदार पंडीत पोपट मराठे (जिल्हा विशेष शाखा), हिरामण तायडे (चाळीसगाव ग्रामीण), विश्वास फकीरा पाटील (पीसीआर), सुमन जगन्नाथ पटाईत (पोलीस मुख्यालय), पोहेकॉ कैलास किसन राणे (दहशतवाद विरोधी कक्ष), मपोहेकॉ शैला जगतराव बाविस्कर (महिला सेल), पोहेकॉ उत्तम त्र्यंबक चिकटे (चोपडा ग्रामीण), ज्ञानदेव जगन्नाथ घुले (दहशतवाद विरोधीकक्ष), सुभाष हिम्मत महाजन (अमळनेर), मधुकर कौतीक पाटील (जिल्हा विशेष शाखा), रविंद्र भिमराव महाले (पोलीस मुख्यालय), प्रकाश रतन चौधरी (पारोळा ), पो.ना. रघुनाथ विठ्ठल कोळी (धरणगाव), पोलीस शिपाई शांताराम माणिकराव सोनवणे (मानव संसाधन विभाग), सफाई कामगार अशोक ईश्वरलाल गोगाडीया (चोपडा शहर) यांचा समावेश आहे.

Protected Content