Home क्राईम विषारी औषध घेतलेल्या तरूणीचे उपचारादरम्यान मृत्यू

विषारी औषध घेतलेल्या तरूणीचे उपचारादरम्यान मृत्यू

0
113


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या आठ दिवसांपासून मृत्यूची झुंज देत असतांना विषारी औषध घेतलेल्या तरूणीची उपचारादरम्यान प्राणज्योत मालविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

शितल अनिल पाटील रा. शेवगे ता. पारोळा जि.जळगाव असे मृत तरूणीचे नाव आहे. शितल ही आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिने १० ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता पिकांवर फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने तिच्या नातलगांनी तिला उपचारासाठी पारोळा येथी कुटीर रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील  उपचारासाठी तिला धुळे येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असतांना १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता तिचा प्राणज्योत मालविली. या घटेनेची नोंद पारोळा पोलीसात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली. आता याचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करत  आहे.


Protected Content

Play sound