कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; चालक कार घेवून फरार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कामावरून दुचाकीने घरी जाण्यासाठी निघालेल्या तरूणाला मागून भरधाव वेगाने येणारी अज्ञात कारने जोरदार धडक देवून जखमी केल्याची घटना जळगाव तालुक्यातील देऊळवाडा गावानजीक गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा बारावाजता घडली. जखमी तरूणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याबाबत जळगाव तालुका पोलीसात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

किरण सोभा कोळी (वय-४३) रा. अंजाळे ता. यावल हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जळगावात खासगी कामासाठी  दुचाकी (एमएच १९ डीएल ४३४०) ने  गेला होता. काम आटोपून घरी परतत असतांना गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा बारावाजेच्या सुमारास देऊळगाव जवळून जात असतांना त्याच्या दुचाकीला मागून अज्ञात भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेत किरण कोळी हा पडल्याने त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर कारचालक हा वाहन घेवून पसार झाला होता. याप्रकरणी गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी करीत आहे.

Protected Content