संभाजी भिडेंचे आता तिरंग्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करणारे मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांनी आता देशाच्या राष्ट्रध्वजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने खळबळ उडालेली आहे.

 

संभाजी भिडे आता पुन्हा एकदा नव्या वादात सापडलेले आहेत. कॉंग्रेस पक्षाने आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांचा एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच, या प्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या व्हिडिओत संभाजी भिडे म्हणत आहेत की, अकबराच्या जनानखान्यात जीवन जगणारी जोधा बाई आणि १५ ऑगस्ट १९४७ साली बाहेर आलेली आमची स्वातंत्र्य लक्ष्मी. स्वातंत्र्य लक्ष्मीच्या खांद्यावर तिरंगा झेंडा म्हणजे काय हो? या तिरंग्या झेंड्याच्या जनानखान्यात गेले ७५ वर्ष आमची स्वातंत्र्यलक्ष्मी कुत्र्याचं निसुख जीवन जगतेय. यावरूनच आता विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.

 

 

कॉंग्रेसने संभाजी भिडे यांच्यावर टिका केली आहे. ‘तिरंगा झेंड्याचा जनानखाना’ असे वक्तव्य करणार्‍या या विकृत माणसाला मोदी आणि फडणवीस गुरु मानतात. देशाच्या एकता आणि अखंडतेला मारक ठरणार्‍या अशा पिलावळींना मानणार्‍या आणि मान देणार्‍या लोकांच्या हातात देशाची सत्ता आहे यापेक्षा दुसरे मोठे दुर्दैव काय असू शकते! असे कॉंग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे. तर, भिडेंवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे.

Protected Content