तलवार बाळगून दहशत निर्माण करणारा पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील दीनदयाल नगरच्या रोडवरील गेटजवळ सार्वजनिक जागी आरोपी मानवी जीवितास घातक असलेले तलवार सारखे शस्त्र सोबत बागळुन दहशत निर्माण करीत होता. याप्रकरणी फिर्यादीवरुन, आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी पोकॉ चेतन अरविंद ढाकणे नेमणूक बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून आरोपी गिरीष गोकुळसिंग जोहरी यांच्या विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून गुरुन ००६/२०२१ शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई बाजारपेठ ठाण्याचे पोना.रविंद्र बिऱ्हाडे,रमण सुरळकर,उमाकांत पाटील,पोकॉ विकास सातदिवे,प्रशांत परदेशी,कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे,ईश्वर भालेराव अशांनी मिळून आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा केले. गुन्ह्याचा पुढील तपास पोना रमण सुरळकर करीत आहे.

Protected Content