चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ प्रतिनिधी । चाकूचा धाक दाखवून चोरी करणार्‍या आरोपीला बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

स्टार लॉनजवळ मित्र-मैत्रिणी बोलत असताना चौघा संशयीतांनी त्यांना चाकू दाखवत मारहाण करून त्यांच्याजवळील चार हजार 600 रुपयांच्या मोबाईलसह सोन्याची चैन व चांदीचे दागिने लांबवल्याची घटना 2 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सचिन शाम खरारे (22, रा.वाल्मिक नगर, भुसावळ) यास सोमवारी सायंकाळी अटक केली आहे. 

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौर, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक कृष्णा भोये, गणेश धुमाळ, अनिल मोरे, मंगेश गोंटला, एएसआय तस्लीम पठाण, नाईक रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे, कृष्णा देशमुख, रवींद्र तायडे आदींनी केली.

 

 

Protected Content