‘कल क्या होगा किसको खबर’ – राणांचा निश्चय तर ठाकरेंची आक्रमक भूमिका

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेत मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निश्चय केला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत मातोश्री वर यायची कुणाची हिम्मत नाही असे म्हटले आहे. त्यामुळे उद्या मातोश्री समोर नेमकं काय होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

असून कार्यकर्ते त्यासह विरोधकांना याविषयीची उत्सुकता आहे. रवी राणा यांनी मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालीसाचे पठण करण्याची भूमिका घेतल्याने यात सहभागी होण्यसाठी सहाशेहून अधिक कार्यकर्ते अमरावतीहून मुंबईला आले आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांचा निर्णय ठाम आहे असं त्यांनी सांगत काहीही झालं तरी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळे ‘कल क्या होगा किसको खबर’ अशी चर्चा रंगत आहे.

Protected Content