जळगावच्या विकासासाठी महापौरांचे ना. गडकरी यांना निवेदन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतून जाणारे मुंबई, नागपूर, पाचोरा, इंदोर आणि औरंगाबाद महामार्गाला जोडणारे रस्ते राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विकसित करून मिळावेत व मनपा हद्दीतून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ठिकाणी उड्डाणपूल विकसित करून मिळावे असे दोन स्वतंत्र निवेदन आज महापौर जयश्री महाजन यांच्यातर्फे केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे दिले.

 

निवेदनाचा आशय असा की, महानगरपालिका अंतर्गत बहुतांशी विकास कामे प्रलंबित आहेत. शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार ही वाढलेला आहे सद्यस्थितीत संपूर्ण शहरात शासनाच्या अमृत पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण भुयारी गटारी योजनांची कामे पूर्णत्वास आलेल्या आहेत. परिणामी संपूर्ण शहरात जलवाहिन्या आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. सर्व शहरवासीयांकडून शहरातील सर्व रस्ते नव्याने तयार करणेबाबत सतत मागणी होत आहेत.

जळगाव महानगरपालिकेला या रस्त्यांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. अशा स्थितीत जळगाव महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी बघता रस्ते अनुक्रमे 30 मीटर, 24 मीटर, 18 मीटर रुंदीच्या असून तिन्ही महामार्गांना जोडणारा आहेत. त्यांची लांबी अंदाजे आठ ते दहा किलोमीटर इतके आहेत. सदर रस्ते राष्ट्रीय महामार्ग विभाग अंतर्गत आवश्यक ती संपादन प्रक्रिया पूर्ण करून विकसित केल्यास मुंबईकडून औरंगाबादकडे किंवा औरंगाबादकडून नागपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक ही शहरातून न जाता सोबत जोडलेल्या नकाशाप्रमाणे वळवणे शक्‍य होणार आहे. यामुळे वाहतूकदारांचा बराचसा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. तसेच सदर वाहतूक वळती केल्यामुळे शहरात महामार्गावरील वर्दळ कमी झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील कमी होणार आहे.

तरी आपणास विनंती की शिवकॉलनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 पासून निघणारा आणि पाचोरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन 753 चे तसेच औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन 753 ला जोडणारा तीस मीटर रुंद रस्ता तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 दीपक फूडच्या पश्चिम बाजूने जाणारा 18 मीटर रुंद रस्ता व वाटिका आश्रम लगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 पासून पिंपळा गट क्रमांक एकशे अठरामधून जाणारा पिंप्राळा गट क्रमांक 284 पर्यंत जाणारा 24 मीटर विकास योजना रस्ता जळगाव शहर सक्र 307 दुध फेडरेशन पासून निघणारा व जळगाव सक्र 118 पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 ला जाणारा 24 मीटर रुंद विकास योजना रस्ता रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग भारत सरकार यांचे निधीतून आवश्यक ती संपादन प्रक्रिया करून विकसित करून मिळाल्यास जळगाव शहराच्या विकासाला उभारी मिळवून शहरातील उद्योजकांना निश्चितच चालना मिळेल तसेच इतर जाणारी वाहतूक शहरातूनच आता मोठ्या रस्त्यावर मिळवल्यास शहरातील अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल आणि इंधनाची बचत होईल. वर नमूद रस्ते केंद्र शासनाच्या निधीतून विकसित करून जळगावकरांना दिलासा द्यावा अशी विनंती जळगाव नगरीच्या महापौर जयश्री सुनील महाजन यांनी केली आहे

 

जळगाव शहर मनपा हद्दीतून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ठिकाणी उड्डाणपूल विकसित करून मिळण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे या ते म्हणतात जळगाव नगरीतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 चारपदरीकरण करणे याबाबत नागरिकांच्या मागणीचा आदर करून या अगोदर आपण घोषणा केली होती. सदर रस्त्याची कामे हाती घेऊन जवळपास 70 टक्के काम पूर्णत्वाकडे आले आहे. मात्र सदर रस्ता शहरातील नागरी वस्तीतून जात असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बरीच नागरी वस्ती असल्याकारणाने अशा परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी अवजड वाहतूक आणि शहरातून महामार्गावर येणारी जाणारी वाहतूक विचारात घेत अनेक अपघात होत असतात.

याअगोदर अपघातामुळे एक हजाराहून अधिक लोकांचे मृत्यू झाल्याची शासन दरबारी नोंद आहे त्यातच अग्रवाल हॉस्पिटल समोर प्रभात कॉलनी चौक विशिष्ट आकाशवाणी चौक म्हणजेच जन. अरुण कुमार वैद्य सर्कल यामध्येही नहीने विकसित केलेले सर्कल अत्यंत धोकादायक आहे आणि याची प्रचिती दिनांक 18 एप्रिल रोजी आली. याठिकाणी मोठा अपघात झाला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही तरी या चौकाचे तांत्रिक दृष्ट्या अभ्यासपूर्ण बदल व्हावेत ही विनंती.

 

वास्तविक पाहता शहरातून जाणारा संपूर्ण महामार्ग म्हणजेच बांबोरी जवळील जुने जकात नाक्या पासून ते पुढे खोटेनगर स्टाफ शिवकॉलनी अग्रवाल हॉस्पिटल आकाशवाणी चौफुली ईच्छादेवी चौफुली नेल्सन मंडेला चौफुली कालिंका माता मंदिर मंदिराजवळील चौफुली असा संपूर्ण सुमारे सात किलोमीटरचा महामार्ग हा उड्डाणपूल म्हणून विकसित करणे आवश्यक आहे. तसेच या राष्ट्रीय महामार्गाचे 12 मीटरचे सेवा मार्ग विकसित केल्यास अवजड वाहने उड्डाणपुलावरून जातील व शहरातील नागरिकांची वाहने सेवा मार्गाचा अवलंब करतील. याकामे अगोदर आपण चारशे चाळीस कोटी रुपये जाहीर केले होते. मात्र कालांतराने बदल होऊन अनेक ठिकाणी अंडर पास झालेले नाहीत सदैव सर्कल तयार झाले. त्यामुळे अनेक अपघात होत आहे. कृपया आपण संपूर्ण उड्डाणपूल विकसित करून जळगावकरांना दिलासा द्यावा अशी मागणी माहापौर जयश्री सुनील महाजन यांनी केली आहे.

Protected Content