काचेची बाटली मारल्याचे तरूण जखमी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथे दारूसाठी पैसे दिले नाही या रागातून एका तरुणाला शिवीगाळ करत काचेची बाटलीने उजव्या कानावर मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, शेख वाजिद शेख आयुब वय-२७, रा. तांबापुरा, जळगाव हा तरुण परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान बुधवार २८ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता सेक शेख वाजित हा सिंधी कॉलनीतील भाजीपाला मार्केट जवळील गेट जवळ उभा होता. त्यावेळी त्याचा ओळखीचा सोनू सलीम कुरेशी रा.तांबापुरा, जळगाव हा त्या ठिकाणी आला. त्यावेळी सोनू याने शेख वाजिद त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावर शेख वाजिदने पैसे नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने संशयित आरोपी सोनू कुरेशी याने शिवीगाळ करत हातात असलेली काचेची बाटली शेख वाजितच्या उजव्या कानावर मारली. त्यामुळे त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराचा दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी २९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता संशयित आरोपी सोनू सलीम कुरेशी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहे.

Protected Content