गावठी पिस्तलांसह जीवंत काडतुसे जप्त : दोघांना अटक

चोपडा प्रतिनिधी | तालुक्यातील वैजापूर ते बोरअजंटी रस्त्यावर पाच गावठी पिस्तुले आणि दहा जीवंत काडतुसांसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

नाशिक येथील पोलिस महानिरीक्षक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांना काही जण गावठी पिस्तुले आणि जीवंत काडतुसांसह येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या अनुषंगाने काल सायंकाळी वैजापूर ते बोरअजंटी रस्त्यावर वन विभागाचा नाक्याजवळ स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा ग्रामीण पोलिसांनी सापळा लावला होता. या ठिकाणी मध्य प्रदेशातून येणारी चारचाकी गाडी (एमएच- १९, सीझेड- ९१०७) पोलिसांनी अडवली. या गाडीत ५ गावठी पिस्तूल व दहा जिवंत काडतूस आढळून आले आहेत.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल मनोज दुसाने यांच्या फिर्यादीवरून मयूर काशिनाथ वाकडे (वय २३, रा. चोपडा), अक्रम खान शेर खान ( रा. जहांगीर कॉलनी, हर्सुल, औरंगाबाद; लखनसिंग मोहनसिंग बर्नला ( पारउमर्टी, जिल्हा बडवाणी, मध्यप्रदेश ) आणि अनुप नवनाथ सोनवणे (रा. पुणे ) या चौघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून यात मयूर वाकडे व अक्रम खान शेर खान या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Protected Content