चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल

बीजिंग, वृत्तसंस्था । चीन सातत्याने आपली लष्करी ताकत वाढवत चालला आहे. सध्याच्याघडीला चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल आहे. या समुद्री शक्तीच्या बळावर चीनकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील विविध भागात आपल्या नौदलासाठी तळ उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रणनितीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास प्रतिस्पर्धी देशांवर कुरघोडी करण्याचा चीनचा उद्देश आहे. पुढच्या दशकभरात अणवस्त्रांची संख्या दुप्पट करण्याचेही चीनने लक्ष्य ठेवले आहे.

ऑगस्ट २०१७ मध्ये आफ्रिकेतील डिजीबाऊटी येथे चीनने परदेशातील पहिला लष्करी तळ स्थापन केला. चिनी नौदलाकडून या तळाचे संचालन केले जाते. त्यानंतरच चिनी नौदलाच्या हिंदी महासागर क्षेत्रातील हालचालीत वाढ झाली. त्याशिवाय पाकिस्तानातील कराची, ग्वादर बंदरातही चीनचा कुठल्याही आडकाठीशिवाय मुक्तपणे वावर सुरु असतो.
.
चीनकडे एकूण ३५० युद्धनौका आहेत. यामध्ये चीनने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. अमेरिकेकडे २९३ युद्धनौका आहेत. टेक्नोलॉजीच्या अंगाने पाहिल्यास, अमेरिका चीनपेक्षा बरीच पुढे आहे. अमेरिकेकडे १० हजार टन वजनाच्या ११ विमानवाहू युद्धनौका आहेत. अमेरिकेच्या एका युद्धनौकेवर ८० ते ९० फायटर विमानांना सामावून घेण्याची क्षमता आहे. चीनकडे अशा फक्त दोन युद्धनौका आहेत. पण चीन आणखी दोन विमानवाहू युद्धनौकांची बांधणी करत आहेत.

Protected Content