तरूणानं साडी गळ्याला गुंडाळून स्वत:ला संपविलं

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुतारवाडा येथील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहरातील सुतारवाडा परिसरात विनय युवराज कोळी (वय-२३) हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरी कोणीही नसतांना विनय कोळी याने लोखंडी ॲगलला साडी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. वडील युवराज भागवत कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.

Protected Content