एकलव्य क्रीडा संकुलात गरबा व दांडिया रास स्पर्धांचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित एकलव्य क्रीडा संकुल व्दारा गरबा व रास दांडिया स्पर्धा २०२२ चे आयोजन  दि.०३ व ०४ ऑक्टोबर २०२२ दरम्यान के.सी.ई. सोसायटी संचालित सर्व शैक्षणिक व  क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांकरिता करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत ०८ वर्षे वयोगटांपासून २५ वर्षे वयोगटावरील विद्यार्थी व खेळाडू सहभाग नोंदिवीत आहेत. स्पर्धेत विजयी खेळाडूंना रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन ०३ ऑक्टोबर २०२२ रोजी डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, जळगांव महानगर पालिका, जळगांव यांच्या हस्ते करण्यात आले. के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी  शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते जगदंबा मातेची आरती करण्यात आली. याप्रसंगी सोनी मराठी या दूरदर्शन वाहिनीवरील हास्य जत्रा मधील कलाकार व मू.जे. महाविद्यालय जळगांव येथील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख हेमंत पाटील, वनविभागातील अधिकारी संदीप पाटील व महाबीज कंपनी मर्या. चे  संजय देवरे उपस्थित होते. स्पर्धेचे प्रशिक्षक म्हणून योगेश मर्दाने, कु. गायत्री ठाकूर व मू. जे. महाविद्यालयातील नृत्य व कला विभागाचे प्रमुख अजय शिंदे व त्यांच्या संपूर्ण टीमने कार्य केले.

स्पर्धेच्या प्रथम दिवशी कु. सृष्टी विशाल कुलकर्णी, शास्वत विशाल कुलकर्णी, कु. अनुष्का जयंत फिरके व कु. माही राकेश फिरके यांना स्मृतीचिन्ह तसेच कु. आर्या संजयसिंग पाटील, निल सुनील पाटील, कु. सिद्धी संदीप पाटील, रौनक रफिक तडवी, कु. नयना निलेश अग्रवाल यांना स्मृतीचिन्ह व रोख पारितोषिक देऊन विजेत्यांस गौरविण्यात आले. सदर स्पर्धा ह्या एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी तसेच मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहेत. स्पर्धेकरिता एस.व्ही.के.एम. महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. रणजित पाटील, एकलव्य जिम्नॅस्टिक्स आकॅडेमीचे मुख्य प्रशिक्षक प्रा. निलेश जोशी तसेच एकलव्य क्रीडा संकुलातील प्रशिक्षक, सहायक प्रशिक्षक व प्रशिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.

Protected Content