मोनाली कामस्कर फाऊंडेशनतर्फे पक्षांसाठी भांडी वाटप ( व्हिडीओ )

0

जळगाव प्रतिनिधी । येथील मोनाली कामस्कर फाऊंडेशनतर्फे यंदादेखील पक्षांसाठी भांडी आणि खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.

मोनाली कामस्कर फाऊंडेशनतर्फे गत ११ वर्षांपासून पक्षांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून पसरट भांड्यांचे वाटप करण्यात येते. यासोबत पक्षांसाठी बाजरीचे दाणे हे खाद्यदेखील देण्यात येते. फाऊंडेशनतर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. या अनुषंगाने यंदादेखील फाऊंडेशनतर्फे हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. आधीच मोबाईल टॉवर्समुळे पक्षांची संख्या कमी होऊ लागली असून उन्हाळ्यात त्यांना पिण्यासाठी पाणीदेखील मिळत नाही. या पार्श्‍वभूमिवर, हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असाच आहे. या उपक्रमास प्रारंभ करतांना नितीन लोटवाला, वसंतराव बाविस्कर, राधेश्याम व्यास, संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

पहा : मोनाली कामस्कर फाऊंडेशनच्या या उपक्रमाची माहिती देणारा व्हिडीओ.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!