बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीतर्फे निषेध (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । बंडातात्या कराडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा येथील बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य करून टिका केली होती. या घटनेचा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र निषेध करत आहे. महाराष्ट्र हा संतांची व वारकऱ्यांची भूमी आहे. वारकरी संप्रदायातील व्यक्तींची अशी भाषा असु शकत नाही. असे बेताल वक्तव्य करणाऱ्या सातारा येथील बंडातात्या कराडकर यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी जेणे करून यापुढे कोणीही बेताल वक्तव्य करणार नाही. अशी मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवार ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता निवेदन देण्यात आले.

 

याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पीता पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पाटील, मनिषा साळी, मिनाक्षी चव्हाण, प्रेरणा सुर्यवंशी, दुर्गेश पाटील, अशोक पाटील, सुशिल शिंदे, राहूल होले, संजय चव्हाण, विनोद सुर्यवंशी, अकील पटेल, सुनील माळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content