अमरनाथ हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालवल्याप्रकरणी तिघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जळगाव-औरंगाबाद रोडवरील अमरनाथ हॉटेलात वेश्या व्यवसाय चालवित असल्याचा प्रकार सोमवारी ३१ जानेवारी रेाजी सायंकाळी उघडकीला आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी तीन जणांना अटक केली आहे. यात हॉटेल मालकाचा समावेश आहे.  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यासंदर्भात माहिती अशी की, जळगाव औरंगाबाद महामार्गावर असलेल्या अमरनाथ हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, आशा पांचाळ,  सुनिल पाटील, किरण धमके, चंद्रकांत चिकटे, संतोष जाधव, रविंद्र सुरळकर, रविंद्र कारंकाळ, मिलींद पाटील यांनी सोमवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अमरनाथ हॉटेलमध्ये छापा टाकला. या कारवाईत राजेश मिठाराम ठोंबरे (वय-४९) रा. जुना खेडी रोड, जळगाव, विकास रमेश सोनवणे (वय-२७) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांच्यासह दोन महिलांसोबत  आढळून आले. याप्रकरणी पोलीस उनिरीक्षक निलेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक शंकर दुलाराम महाजन वय ४१ रा. हनुमान नगर, जळगाव, ग्राहक राजेश मिठाराम ठोंबरे  आणि विकास रमेश सोनवणे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे करीत आहे.

Protected Content