पाचोरा तालुक्यात ३३ पैकी १९ ग्रामपंचायतीत महिला सरपंचपदी महिलांची निवड

 

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यात ९६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात पार पडल्या. १३ फेब्रुवारीरोजी ३२ पैकी २१,  १५ फेब्रुवारीरोजी ३१ पैकी २१ तर १७ फेब्रुवारी रोजी ३३ पैकी १९ महिलांची सरपंचपदी वर्णी लागली आहे. 

 

सारोळा बु” येथे अनुसूचित जातीचा उमेदवार न मिळाल्याने सरपंचपदाची जागा रिक्त राहिली असुन या ग्रामपंचायतीत केवळ उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

पाचोरा तालुक्यात  १७ फेब्रुवारीरोजी  झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडी  याप्रमाणे – वडगांव खु” प्र. पा.  दिपाली हिरालाल पाटील (सरपंच), सखुबाई कैलास मोरे (उपसरपंच), पिंप्री बु” प्र. पा –  ज्योतीबाई राजपुत (सरपंच), अरुंधती पाटील (उपसरपंच ), खडकदेवळा बु”  प्रविण ज्ञानेश्वर पाटील (सरपंच), शोभाबाई संजय शिंदे (उपसरपंच), होळ –  राजेंद्र प्रल्हाद पाटील (सरपंच), सपना विजय चौधरी (उपसरपंच), म्हसास – सुनिल लक्ष्मण पाटील (सरपंच),  नबाबाई अर्जुन भिल (उपसरपंच), निपाणे –  मनिषा रोहण पाटील (सरपंच), वाल्मिक श्रीधर पाटील (उपसरपंच), चिंचखेडा खु” – सुनिल जगन्नाथ पाटील (सरपंच),  बाळासाहेब भास्कर पाटील (उपसरपंच), सामनेर  – संगिता भोलेनाथ भिल (सरपंच),  बाळकृष्ण जगतराव साळुंखे (उपसरपंच), भोकरी  – अरमान अब्दुल काकर (सरपंच), अस्लम रुस्तम काहकर (उपसरपंच), पुनगाव  – भारती प्रल्हाद गुजर (सरपंच),  अनिल बारकु पाटील (उपसरपंच), सारोळा बु”  वाल्मिक जगन्नाथ पाटील (उपसरपंच), खेडगाव (नंदीचे) – स्वाती कैलास कुमावत (सरपंच), भटेसिंग दशरथ पाटील (उपसरपंच), सावखेडा बु” – सुलोचनाबाई जगन्नाथ वाघ (सरपंच), राजेश धना सोनवणे (उपसरपंच), बिल्दी – अंजनाबाई गजानन पाटील (सरपंच), निलेश नाना पाटील (उपसरपंच), पिंप्री खु” प्र. पा. – अमोल दादाभाऊ बाविस्कर (उपसरपंच), कल्पना रमेश पाटील (उपसरपंच), पिंपळगाव (हरे.) – सुमनबाई सुभाष सावळे (सरपंच), सुखदेव तोताराम गिते (उपसरपंच), शहापुरा – योगेश भगवान रजपूत (सरपंच), सुनिल प्रकाश परदेशी (उपसरपंच), निंभोरी  मदन वजीर तडवी (सरपंच) यशोदाबाई सरदार जाधव (उपसरपंच), चिंचपुरे  – अक्काबाई हुसेन तडवी (सरपंच),  सचिन अनिल कोकाटे (उपसरपंच), वडगांव कडे –  मछिंद्र श्रावण तडवी (सरपंच), विकास गोपाल पाटील (उपसरपंच), सार्वे बु” प्र. भ.  तिरुनाबाई संभाजी पाटील (सरपंच), अनिल यादव पाटील (उपसरपंच), साजगांव – समाधान धोंडु सोनवणे (सरपंच), अनिता राजु शिंदे (उपसरपंच), वाघुलखेडा – अरुणाबाई दिनकर पाटील (सरपंच),  शोभाबाई रविंद्र ठाकरे (उपसरपंच), आसनखेडा बु” – इंदिराबाई बबन पाटील (सरपंच), कल्पेश राजेश बोरसे (उपसरपंच),  मोहाडी –  ज्योती हेमराज पाटील (सरपंच), लोटन भिला महाजन (उपसरपंच), अंतुर्ली खु” प्र. पा.  नुतन संदिप पाटील (सरपंच), शुभांगिनी विनोद पाटील (उपसरपंच), लासुरे – सविता प्रकाश देवरे (सरपंच),  प्रेमराज दशरथ पाटील (उपसरपंच), नाचणखेडा – आरती गौतम घोडेस्वार (सरपंच),  पुनम धरमसिंग निकुंभ (उपसरपंच), डोकलखेडा –  दिपाली योगेश बाविस्कर (सरपंच), सुनिल भगवान पाटील (उपसरपंच), राजुरी – राहुल रामराव पाटील सरपंच), सबरु शेखलाल तडवी (उपसरपंच), भोरटेक –  गुलाब शिवराम चांभार (सरपंच), श्रावण भावराव पाटील (उपसरपंच), कुऱ्हाड बु” – उदयसिंग लखीचंद वंजारी (सरपंच),  रुपमन शरद पाटील उपसरपंच), नगरदेवळा – प्रतिक्षा किरण काटकर (सरपंच), विलास राजाराम भामरे (उपसरपंच)

 

पुनगाव – मांडकी  ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा 

 

पुनगाव – मांडकी   गृप ग्रामपंचायतवर शिवसेनेच्या भारती प्रल्हाद गुजर यांची सरपंचपदी तर अनिल बारकू पाटील (टिल्लू आप्पा) यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी सरपंच प्रविण पाटील, चिंतामण पाटील, रविंद्र गुजर यांचे विशेष सहकार्य लाभले. पुनगाव व मांडकी ग्रामस्थांकडून नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .

Protected Content