पाचोरा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात

पाचोरा प्रतिनिधी । येथे आज प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शासकीय ध्वजारोहणासह ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शासकीय ध्वजारोहण

प्रजासत्ता दिनानिमित्त आज सकाळी ९ वाजता पोलीस मैदान येथे शासकीय ध्वजारोहण उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आ. किशोर पाटील, उपपोलीस अधीक्षक केशव पातोंड, तहसीलदार बी ए कापसे, नायब तहसीलदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, नायब तहसीलदार संभाजी पाटील, गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, बांधकाम विभागाचे डी. एम. पाटील, नगरपालिकाचे उपमुख्यअधिकारी राजेंद्र पाटील, कृउबा समिती सभापती सतीश शिंदे, पं.स. प्रभारी सभापती अनिता पवार, उपनगराध्यक्ष शरद पाटे, सर्कल अधिकारी विनोद कुमावत, संजय साळुंखे, वनपाल अधिकारी ज्ञानेश्‍वर देसाई, विद्या अमृतराव, पत्रकार गणेश शिंदे, संदीप महाजन, लक्ष्मण सर्यवंशी, राहुल महाजन, सी.एन. चौधरी, स्वप्नील कुमावत, योगेश पाटील, विजय पाटील, एस.एस. चौधरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ बन्सीलाल जैन, समाधान पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव गजमल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलिस पथकाची सलामी

उपपोलिस निरीक्षक पंकज शिंदे, गणेश चोभे, दत्तात्रय नरवाडे, अमृत पाटील, राहुल सोनवणे, राहुल बेहरे, प्रकाश पाटील, नितीन सुयर्वंशी, विजय पाटील, गजानन काळे, मनोज माळी, प्रशांत पाटील, दीपक सुरवाडे, वसंतसिंग पाटील, यशवंत गोरसे, हंसराज मोरे, सुनील पाटील, नितीन आगोने, होमगार्ड समदेशक अधिकारी रवींद्र पाटील, चंद्रकांत महाजन, होमगार्ड ज्ञानेश्‍वर महाजन, मनोज पाटील, लक्ष्मण पाटील, शैलेश बिर्‍हाडे, रोहिदास पाटील यांच्या पथकाने सलामी दिली. याप्रसंगी गो. से. हायस्कूलच्या स्काऊट-गाईड पथनाकेही सलामी दिली. ट्रॅफिक हवालदार प्रकाश पाटील, किशोर पाटील, नंदकुमार जगताप हेदेखील यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गिते सादर केली.

शहरात सर्वत्र कार्यक्रम

दरम्यान, सकाळी ७.३० वा नगरपालिका येथे ध्वजारोहण नगरपालिकाचे उपनगराध्यक्ष शरद पाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपमुख्यअधिकारी राजेंद्र पाटील नगरसेवक आनंद पगारे सर्व अधिकार कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. हुतात्मा स्मारक येते ध्वजारोहण शहीद झालेले स्वातंत्र्य सैनिक यांचे बंधू मगन राजाराम लोहार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

गो से हायस्कुल येथे खालील देशमुख हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी पिटीसी चे चेअरमन संजय वाघ एस डी पाटील नगरसेवक वासुदेव महाजन भोला आप्पा पाटील, चंदू येवले, एस. एस. पवार, ए. जे. महाजन, पी जे पाटील, रोहन पाटील उपस्थित होते.

Add Comment

Protected Content