जागर शक्तीचा-उत्सव भक्तीचा : नवरात्रोत्सवानिमित्त पाचोऱ्यात दांडियाचे आयोजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांचे सुपूत्र सुमित किशोर पाटील यांनी भडगाव येथील दहीहंडी, पाचोरा येथे गणेशोत्सवात साक्षात काशी विश्वनाथाचे दर्शन त्यास मिळालेला अभुतपुर्व प्रतिसादा नंतर येणार्‍या नवरात्रोत्सवात पाचोरा येथे दि. २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान गरबा – दांडीयारास स्पर्धेचे आयोजन केले आहे.

सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन ग्रिन अँपल इन्टेटस् यांच्या कडे देण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी २ अक्टीवा, २ फ्रीज, २ टॅब, ८ मोबईल, २ स्मार्ट, ४२ इंच टी. व्ही. २ वॉशिंग मशिन, २ सायकली अंतिम फेरीतील विजेत्यांना देण्यात येणार आहे.

या शिवाय दररोज देवीरूप माता – भगिनींसाठी मॅचिंग साडी असल्यास पाच पैठणी साड्यांची भेट आणि प्रेक्षकांन मधुन दररोज ६ प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या व्यक्तीस स्वतंत्र बक्षीस देण्यात येणार आहे या आकर्षक बक्षिसे सोबतच प्रत्येक सहभागी स्पर्धकांस सर्वांना स्वतंत्र गिफ्ट देण्यात येणार आहे.

या गरबा दांडिया रास स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सारेगमप विजेती वैशाली माडे यांच्या सुमधुर आवाजात गीतांचे बोल आणि गुजराती कच्ची ढोल वाद्यांच्या ठेक्यावर दांडीया – गरबा मध्ये स्वतः सहभाग घेऊन नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणार आहेत.

सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या उपस्थितीत भव्य आकर्षक बक्षीसांची लयलुट केली जाणार आहे तरी नागरिकांनी व माता – भगिनी या नवरात्र उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत मुकुंद बिल्दीकर व सुमित किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Protected Content