शिवजयंती दिनी टँकरचे लोकार्पण

भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी शिवजयंती निमित्त रहिवाश्यांसाठी टँकरचे लोकार्पण केले.

शिव जयंती निमित्त भुसावळातील नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी वार्डातील रहीवाश्यांना दिली आगळी वेगळी भेट दिली. वार्डातील गरीब व मध्यमवर्गीय रहिवाश्यांचे येत्या उन्हाळ्यात पाण्यासाठी हाल होऊ नये म्हणून भुसावळ येथे शिवजयंती निमीत्त वॉर्ड क्रमांक २० मध्ये या भागातील नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू)ठाकुर यांच्या तर्फे पाण्याच्या टँकरचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी व प्रमोद सावकारे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष दिनेश नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे,मुकेश गुंजाळ,पिंटू कोंठारी,प्रवीण गुंजाळ,निक्की बतरा,सतीश सपकाळे,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, अरुण धनगर, चंदू बडगे, संजू ठाकुर, स्वप्नील गोकूळ, सोनार बंडू, निलेश शहा, मोहन ढोले,आकाश राजपुत,प्रवीणसिंग पाटील,प्रमोद ठाकुर,जगदीश ठाकुर,गोकूळ शेरा, विकास खडके,शुभम भावसार,रवी ढगे,निखील वाणी,सोन्या गुजी,चेतन मिस्त्री,प्रदीप कोळी,वैभव सुरंगे,संजय खडसे,स्वप्नील टेलर,दीपक कापसे,मुरली ढोले,वासू खंडारे,नरेंद्र संघवी,प्रतीक खडसे,सागर ढोले,दर्शन बिर्‍हाडे,स्वप्नील पाटील,पवन खंदारे,प्रथमेश दिधे,कृष्णा अहिरे व शिवाय ग्रुप मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.

नगरसेयक पिंटू ठाकूर यांनी आधी दिनदयाल नगरात स्वखर्चाने बोअरिंग करुन वाडीतील लोकांच्या घरात पाणी पोहोचवले आहे. यानंतर त्यांनी टँकर उपलब्ध केले आहे.

Protected Content