चोपड्यात सीसीआयची कापूस खरेदी सुरू होणार

चोपडा प्रतिनिधी । येथे शेतकरी कृती समितीच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदी सुरू होण्यासाठी तहसीलदार अनिल गावित यांच्या दालनात बैठक झाली.

यात सीसीआयचे प्रतिनिधी पन्नालाल सिंह यांनी त्यांना सहकारी कर्मचारी, गोडाऊन व जिनिंग ची सुविधा मिळाल्यास खरेदी सुरू होऊ शकते हे सांगितल्यावर तहसीलदार यांनी सीसीआयचे विभागीय व्यवस्थापक दास यांचेशी चर्चा केली. त्यांनी सहकारी देण्याचे कबुल केले व चुका होऊ नये यासाठी बाजार समिती देखील मदत करेल असा विश्‍वास सभापती नारायण पाटील यांनी व्यक्त केला. तर सूतगिरणी त्यांचे गोडाऊन उपलब्ध करून देणार असल्याचे चेअरमन कैलास पाटील यांनी बैठकीत आश्‍वासन दिले. त्या नंतर खानदेशातील सर्व जीनिंग च्या अडचणी सोडवण्याची प्रक्रिया सुरू असून तसा करार सीसीआय सोबत लवकरच होईल असा आशावाद जिनींग असोसिएशन चे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी फोन वर चर्चेत भाग घेताना व्यक्त केला. तर चोपडा येथील मे विठ्ठल दास गोवर्धन जीनच्या वतीने संजय भाट यांनी चर्चेत भाग घेतला.

पुढील आठवड्यापासून गुरुवार,शुक्रवार व शनिवार हे तीन दिवस खरेदी करण्यात येईल असे बैठकीत ठरले. बैठकीस शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील, माजी आमदार कैलास पाटील,बाजार समिती सभापती नारायण पाटील,भागवत महाजन,मुकुंद पाटील, प्रा प्रदीप पाटील,रावसाहेब पाटील,अजित पाटील,जीवन पाटील,प्रकाश रजाळे,तुकाराम पाटील,अनिल पाटील,विजय पाटील,प्रल्हाद पाटील,रोशन पाटील,संजय पाटील,रुपेश माळी,राकेश बारेला हे हजर होते.

Protected Content