११ मे रोजी साजरा करा महात्मा दिन- सचिन गुलदगड यांचे आवाहन

चोपडा प्रतिनिधी । येत्या ११ मे रोजी येणारा महात्मा दिन हा प्रशासकीय पातळीवर साजरा करण्यात यावा असे आवाहन संत सावता माळी युवक संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष, सचिन गुलदगड यांनी केले आहे.

११ मे १९८८ रोजी महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहादुर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने ज्योतिबा फुलेंना समाजसुधारनेच्या महान कार्यामुळे भारत देशातील पहीली महात्मा हि पदवी प्रदान केली. तेव्हा पासून आपण महात्मा ज्योतीबा फुले असा उच्चार करतो त्यांच्या नावापुढे महात्मा ही उपाधी लावतो.

म्हणूनच(२०१६) या वर्षांपासुन ११ मे हा दिवस महात्मा दिन म्हणून साजरा व्हावा, यासाठी श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष, सचिन गुलदगड यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. आपण सर्वजन महात्मा दिनसाजरा करणारच आहोत, इतरानांही साजरा करायला सांगुयात, आणि महात्मा दिनाचे महत्व पटवून देवू आणि आपआपल्या भागातील तहसील, जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून व्यापक स्वरूपात प्रशासकीय स्तरावर महात्मा दिन साजरा होण्यासाठी प्रयत्न करू, असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांनी केले.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर लॉकडावूनच्या काळात आपण ११ मे २०२० रोजी महात्मा दिन घरातच थांबून फुलेंची पुस्तके वाचून, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून साजरा करावा,असे श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य चे खानदेश विभागीय अध्यक्ष जितेंद्र महाजन, महिला आघाडी जिल्हाअध्यक्ष संध्या नरेश महाजन; जळगाव जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भगवान माळी, जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र माळी, शहर अध्यक्ष दशरथ महाजन, तालुकाध्यक्ष राजू भाऊसाहेब, जय बजरंग बिल्डर्स अँड डेव्हलपर यांचे मालक दिपक श्रावण माळी, चोपडा तालुका उपाध्यक्ष अल्केश माळी, रोहित माळी, महेंद्र माळी, विठ्ठल माळी, रोहित माळी, राहुल माळी, मयूर माळी, समाधान माळी, महेंद्र माळी राहुल माळी, राकेश माळी, गौरव माळी, प्रदीप माळी, तालुका संपर्क प्रमुख समाधान प्रभाकर माळी यांनी आवाहन केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content