योगेश मराठे यांना ‘एसीएसआयआर’तर्फे पीएच.डी. प्रदान

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी योगेश नाना मराठे यांना नुकतीच अकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च (एसीएसआयआर) नवी दिल्लीच्या वतीने पीएच.डी. प्रदान करण्यात आली.

योगेश मराठे यांनी रसायनशास्त्राच्या पॉलिमर सायन्स या विषयात डिझाइन सिन्थेसिस अँड क्रीस्टॉलायझेशन बिहेवीअर ऑफ न्यू बोरासस इंकॉर्पोरेटेड पोलीलॅक्टिक ऍसिड कंपोझिट अँड नॅनोकंपोझिट या विषयावर प्रबंध सादर केला होता. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथून त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले असून राष्ट्रीय प्रयोगशाळेतील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. मनोहर बडीगर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

योगेश मराठे हे पत्रकार नंदलाल मराठे यांचे लहान बंधू असून ते महात्मा गांधी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.त्यांच्या या यशाबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड.संदीपभैय्या पाटील,माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील,चोपडा पीपल्स बँकेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी,चोपडा नगरपरिषदेचे गटनेते जीवन चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content