राजीव शुक्ला यांनी नाकारली काँग्रेसची उमेदवारी

नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी पक्षाकडून मिळणारी राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याची माहिती एका ट्विटच्या माध्यमातून जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राजीव शुक्ला हे बीसीसीआयमधील मातब्बर व्यक्तीमत्व असून ते काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदारही आहेत. दरम्यान, आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्ला यांना पक्षाने गुजरातमधून उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली होती. तथापि, शुक्ला यांनी उमेदवारी नाकारली असून या संदर्भात एक ट्विट केले आहे. यात ते म्हणाले की, सोनिया गांधी यांनी राज्यसभा उमेदवारीबाबत आपल्याला विचारणा केली म्हणून त्यांचे आभार. मात्र आपण संघटनात्मक कामांमध्ये व्यस्त असल्यान उमेदवारी घेणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राजीव शुक्ला हे आधी महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद हे त्यांचे शालक आहेत.

Protected Content