महापालिकेला लाभले तीन उपायुक्त

जळगाव, प्रतिनिधी | राज्यशासनाकडून महापालिकेच्या अप्पर आयुक्त चंद्रकांत खोसे व उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार यांची बदली करण्यात आली आहे. श्री. खोसे यांची पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून तर डॉ. कहार यांची भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

खोसे  यांच्याजागेवर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी उत्कर्ष गुटे यांची उपायुक्त तर हिंगणघाट नगरपालिकेतील मुख्यअधिकारी पदावर असलेले मिनानाथ दंडवते यांची जळगाव उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर सहकारी संस्था (साखर)विशेष लेखा परीक्षक वर्ग १ अजित मुठे यांना  उपायुक्तपदी नियुक्ती मिळाली आहे. दिलेल्या पदावर त्वरीत रुजू होण्याचे बदली आदेश म्हटले आहे. महापालीकेच्या अप्पर उपायुक्त व उपायुक्त या दोघांची बदली झाल्यने आता तीन उपायुक्त महापालिकेला मिळणार आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या कार्यकाळात दोन उपयुक्त असतांना त्यांनी अप्पर आयुक्त यांची नियुक्ती केली होती. आता पुन्हा महापालिकेला तीन उपायुक्त मिळाल्याने प्रशासनाच्या कामात गती येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. महापालिकेकडून वारंवार मागणी केल्यानंतर ३ उपायुक्त राज्यशासनाने नियुक्त केले आहेत.

Protected Content