जामनेर येथे ज्ञानगंगा विद्यालयात शिक्षक-पालक सभा

be6ec03d d718 424c 93aa 47d0784d6556

जामनेर, प्रतिनिधी | येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज (दि २५) शिक्षक पालक सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.

 

विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. त्यावेळी शिक्षक पालक संघाच्या सदस्या मनीषा भारंबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सभेमध्ये विविध विषय मांडण्यात आले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, उपस्थिती, स्वच्छता, शारीरिक व बौद्धिक, विकास कसा साधता येईल, या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सोनवणे यांनी परिवहन समिती व शिष्यवृत्ती योजना संदर्भात पालकांना समुपदेशन केले. तसेच शाळेची गुणवत्ता व विद्यार्थ्यांचे उपस्थितीचे प्रमाण वाढण्यासाठी पालकांना सूचना दिली. तसेच स्नेहल पाटील यांनी विद्यार्थ्यांचा कल पाहून त्यांना त्या क्षेत्रामध्ये वाव द्या खेळ, नृत्य, संगीत, चित्रकला,स्पर्धा परीक्षा वकृत्व स्पर्धा, या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहभागी होऊ द्यावे, यासाठी पालकांना विनंती केली. संघाचे सदस्य वानखेडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन व्ही.एस.कोळी यांनी केले तर प्रस्ताविक व्ही.आर. खोंडे यांनी केले.
व्ही.एन.पाटील यांनी आभार मानले. सभा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content