विद्यापीठात ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी’ यांच्या नावाने ऑनलाईन व्याख्यानमालाचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन आणि विस्तार विभाग दर महिन्याला ‘कयवित्री बहिणाबाई चौधरी’ या नावाने ऑनलाइन व्याख्यानांची मालिका सुरू करत आहे. १८ फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे व्याख्यान होणार आहे.

या व्याख्यानमालेत शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, स्पर्धा परीक्षा, समाजकारण, राजकारण, सांस्कृतीक, भारतीय प्रशासन सेवेतील विविध अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, अर्थकारण व महिलांच्या समस्यां अशा विविध विषयांवर समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहे.

शुक्रवार दि.१८ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी ४ वाजता व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प पद्मश्री पुरस्कार प्राप्त पुणे येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.गिरीष प्रभुणे हे ऑनलाईन पध्दतीने गुंफणार आहेत. ‘भारताच्या उभारणीत भटके विमुक्तांचे योगदान’ या विषयावर ते बोलणार आहेत. झुम-लिंक, युट्युब, फेसबुक वर व्याख्यान ऐकता येईल. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व्याख्यानाची लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्याख्यानमालेस ऑनलाईन उपस्थित राहण्याचे आवाहन आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक प्रा.मनिष जोशी यांनी केले आहे.

 

 

 

Protected Content