अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण जागीच ठार; हॉटेल गारवा समोरील घटना

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशीराबादजवळील हॉटेल गारवा समोरील महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण जागीच ठार झाल्याची घटना घडलीय. या अपघातप्रकरणी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

गोकूळ उर्फ आण्णा सुकलाल अडकमोल वय 38 रा. नवनाथ नगर,वाघनगर जळगाव, असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील वाघनगर परिसरातील नवनाथ नगर येथे गोकूळ अडकमोल हा कुटुंबासह वास्तव्यास होता. तो जळगाव भुसावळ मार्गावर खाजगी प्रवासी वाहनावर चालक म्हणून कामाला होता. 18 मार्च रोजी धुलिवंदन असल्याने गोकूळ मित्रासोबत त्याच्या मूळ गावी नशीराबाद गेला होता. तेथून एकटा हॉटेल गारवा येथे आला. याठिकाणी  रात्री 11 वाजेच्या सुमारास महामार्गावर पायी चालत असतांना अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनधारक वाहनघेवून घटनास्थळावरुन पळून गेला होता. हॉटेल गारवा येथील कामगारांसह नागरिकांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंत्यविधीसह इतर कार्यक्रम आटोपल्यानंतर बुधवार 23 मार्च रोजी या अपघातप्रकरणी मयत गोकूळ यांचा भाऊ कपील अडकमोल यांनी नशीराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन मृत्यूस कारणीभूत अज्ञात वाहनधारकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल  राजेंद्र ठाकरे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!