अखेर हिंदुस्थानी भाऊला जामीन मंजूर

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । मुंबई सत्र न्यायालयाने अखेर हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक याला जामीन मंजूर केला. धारावीमधील विद्यार्थी आंदोलनाप्रकरणात विकास पाठक याला एक फ्रेब्रुवारी रोजी धारावी पोलिसांनी अटक केली होती.

दहावी-बारावीचे विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी  भडकवल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता हिंदुस्तानी भाऊला मुंबई सत्र न्यायालयातून जामीन मंजूर केला आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थांना चिथावल्याबद्दल फाटक याला 1 रोजी अटक करण्यात आली होती.

हिंदुस्थानी भाऊच्या वतीने ऍड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला होता. याआधी हिंदुस्तान भाऊचा बांद्रा महानगर दंडाधिकारी कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला होता. सेशन्स कोर्टाकडून त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. ३० हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तितक्याच रकमेसह एक किंवा दोन हमीदार देण्याच्या अटीवर सेशन्स कोर्टाने भाऊला जामीन मंजूर केला आहे.

 

 

 

 

Protected Content